स्थैर्य, सातारा, दि. 12 : शेतजमीन वाहिवाटण्याच्या कारणावरून मांडवे (ता.सातारा) येथे पती-पत्नीस लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जखमी केलेबाबत येथीलच दोघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सलीम महंमद मुलाणी व त्याची आई रशिदा मुलाणी (रा.मांडवे,ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नवे आहेत.मारहाणीत समशउद्दीन सुलेमान मुलाणी व त्यांची पत्नी सुरय्या मुलाणी जखमी झाले असून सुरय्या मुलाणी यांचा पाय व हाताची करंगळी मारहाणीत फ्रॅक्चर झाली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समशउद्दीन मुलाणी व त्यांचा पुतण्या सलीम मुलाणी यांची मांडवे येथील इनाम नावाच्या शिवारात शेजारी-शेजारी शेतजमीन आहे.सोमवारी सकाळी शमशउद्दीन मुलाणी हे पत्नीसोबत त्यांच्या शेतात गेले असता पुतण्या समीर व त्याची आई राशिदा मुलाणी यांनी ‘तुम्ही आमच्या जमिनीत अतिक्रमण केले आहे’ असे म्हणून शिवीगाळ,दमदाटी करण्यास सुरुवात केली.यावेळी त्यांनी शेतातील पीव्हीसी पाईप व चेंबरही फोडला.त्यांना अडवण्यासाठी पती पत्नी गेले असता दोघांनाही लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
मारहाणीत समशउद्दीन मुलाणी यांना जबर मुका मार लागला तर पत्नी सुरय्या यांच्या डाव्या पायाचा घोटा व उजव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली.त्यांच्यावर कराड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याची फिर्याद समशउद्दीन मुलाणी यांनी गुरुवारी सायंकाळी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली असून समीर मुलाणी व राशिदा मुलाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.