फलटणमध्ये दोनशे रुपयांच्या बनावट नोटा; नागरिकांनो सतर्क रहा


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । फलटण । गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरांमध्ये दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनामध्ये आलेले आहेत. यामध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचा नंबर एकच आहे. बहुदा एकाच नंबरच्या बऱ्याच नोटा चलनामध्ये आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी फलटणकर नागरिकांनी सतर्क राहून आपल्याकडील नोटा तपासूनच घ्याव्यात.

सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध यात्रा सुरू आहेत. या यात्रांमधून या दोनशे रुपयांच्या चलनी नोटा फलटणमध्ये आल्या असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!