दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । सातारा । गेल्या दोन महिन्यापासून सातारा मध्यवर्ती आगाराच्या आवारात सुमारे 70 कर्मचार्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक चिंचणीची ची निकड लक्षात घेऊन नगरसेवक वसंत लेवे यांनी अन्नधान्य कीट वाटप केले या कामासाठी लेवे यांनी पदरमोड करत तातडीची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी लेवे यांना मनापासून धन्यवाद दिले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपूर्ण महाराष्ट्रात गाजतो आहे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे सातारा मध्यवर्ती आगाराच्या कार्यालय परिसरात 70 कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात ठाण मांडून बसले आहेत हे सुरू असताना दुसरीकडे त्यांना आर्थिक चणचण ही सोसावी लागत आहे .महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचारी संघटना सदस्य सुरेश जगताप यांनी वार्ड क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत लेवे यांना या परिस्थितीची कल्पना दिली लेवे यांनी तातडीने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य किट स्वरूपात तातडीने उपलब्ध करून दिले .या कामांमध्ये ओमकार केंजळे व राजन चतुर यांनी सहकार्य करत सातारा आजाराच्या परिसरात हा मदत वाटपाचा कार्यक्रम घडवून आणला.
या कर्मचाऱ्यांना वसंत लेवे यांच्या हस्ते अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत हजर व्हावे यासाठी आवाहन करत आहे मात्र काही मागण्या ठामपणे मान्य होण्यासाठी कर्मचारी संपावर अडून बसले आहेत मात्र त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेताना वसंत लेवे यांनी स्वतः पदरमोड करत एका वेगळ्या माणुसकीचा परिचय दिला .सुरेश जगताप यांनी आपल्या मनोगतात याच माणुसकीचा उल्लेख करून वसंत लेवे यांना मनापासून धन्यवाद दिले माणूस अडचणीत असतो त्यातून त्याला उभे करणे हा आजपर्यंतचा माझ्या स्वभावाचा भाग राहिला आहे त्यामुळे माझी मदत ही निरपेक्ष स्वरूपाची आहे अशी भावपूर्ण प्रतिक्रिया वसंत लेवे यांनी यावेळी दिली .एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या तातडीच्या मदतीबद्दल लेवे यांच्या कुटुंबियांचे आभार मानले.