स्थैर्य, फलटण, दि. १४ : काल वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हजारो फोन आले. परंतु कोव्हीड बाबतीत माहिती घेत असल्याने सर्व फोन कॉल्सना उत्तर देऊ शकलो नाही, असे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटसद्वारे स्पष्ट केलेले आहे.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस हा तिथीप्रमाणे गुडीपाडव्याच्या दिवशी साजरा होत असतो. परंतु कोरोनाच्या प्राश्वभूमीवर ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केलेले होते. तरी हजारोंच्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना फोन आले परंतु कोव्हीडची माहिती घेत असल्याने फोनना उत्तर देऊ शकलो नाही, असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटसद्वारे स्पष्ट केलेले आहे.