नगरसेवक सनी अहिवळे यांनी 1200 कुटूंबांना दिला मदतीचा हात; सनी अहिवळे यांचा स्तुत्य उपक्रम : पांडुरंग गुंजवटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २६ : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक तथा पालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती सनी अहिवळे यांनी स्वखर्चातून शहरातील मंगळवार पेठेतील प्रभाग क्रमांक 2 मधील 1200 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मदतीचा हात दिला आहे, त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून कोरोना काळामध्ये गरजूना नगरसेवक सनी अहिवळे हे नेहमीच मदत करत असतात, असे मत फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी व्यक्त केले.

याबाबत बोलताना नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी सांगीतले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे अनेक कुटूंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा संकट काळात या गरजू कुटूंबांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. याच जबाबदारीच्या भावनेतून ना. श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील 1200 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत अशा गरजू कुटूंबांना आणखीन मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पांडुरंग गुंजवटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे शहरवासियांनी सद्यस्थितीत लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शिवाय वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे व सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोना संबंधी कोणतीही लक्षणे असल्यास न घाबरता तात्काळ तपासणी करुन घ्यावी. अशा पद्धतीने जागृत राहून आपण कोरोनाला हद्दपार नक्की करु शकतो, असेही आवाहन यावेळी सनी अहिवळे यांनी केले.

दरम्यान, कठीण काळात गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरुपात मदतीचा हात दिल्याबद्दल सनी अहिवळे यांना प्रभागातील नागरिक धन्यवाद देत आहेत.


Back to top button
Don`t copy text!