स्थैर्य, फलटण, दि. २४ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउन नंतर अनेक कुटुंबावर संकट कोसळले. अशा संकटसमयी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार पेठ, फलटण येथे नगरसेवक सनी अहिवळे यांनी स्वखर्चाने अन्नछत्राद्वारे दररोज सुमारे पाचशे ते सातशे लोकांना जेवण देण्याचा उपक्रम राबवला आहे. याचा फायदा अनेक गोरगरीब गरजूंना होत असून त्यांची उपासमार थांबली आहे. नगरसेवक सनी अहिवळे यांनी राबविलेल्या या दातृत्वाचे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही कौतुक करुन शाबासकीची थाप दिली आहे. याबद्दल सनी अहिवळे यांनी आभार व्यक्त करत आपण दररोज हा उपक्रम राबवणार असून श्रीमंत रामराजेंच्या फलटण नगरीत कोणीही उपाशी राहणार नसल्याची ग्वाही देत सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळत आपल्या घरीच सुरक्षित राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन हि नगरसेवक सनी अहिवळे यांनी केले आहे.