
स्थैर्य, सातारा, दि. २१: साताराचे नगरसेवक यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पुणे येथे गेल्यानंतर ते बाधित झाले होते. त्यामुळे तेथील रुग्णालयात 11 दिवस उपचार घेवून ते कोरोनामुक्त झाले असून 8 दिवस पुणे येथेच घरी उपचार घेवून ते सातारला येणार आहेत.
सातारा सातारा विकास आघाडीचे नगरसेवक श्रीकांत आंबेकर हे दि.30 ऑगस्ट रोजी आपल्या गणेशमुती विक्रीचा व्यवसाय उरकून पेण, पुणे येथे व्यापार्यांना पैसे देण्याकरीता 2 दिवस गेले होते. दि.1 सप्टेंबर पासून पुणे येथेच 7 दिवस थंडीतापाने आजारी पडले. दि. 8 सप्टेंबर पासून ते दिनांक 18 सप्टेंबर पर्यंत आंबेकर यांना पुणे येथे भारती हॉस्पिटल तसेच रत्ना मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचार घ्यावे लागले. अशा परिस्थितीत पुणे येथे बेड शिल्लक नसताना तात्काळ खा. उदयनराजे भोसले यांनी कृषीमंत्री विश्वजीत कदम यांच्याशी संपर्क साधून आंबेकर यांना तातडीने अॅडमीट करून उपचार करण्यास सांगितले. त्यानुसार आंबेकर यांच्यावर 11 दिवस उपचार होवून ते बरे झाले असून पुणे येथेच मुक्कामी असुन 8 दिवस घरी उपचार घेत आहेत. लवकरच सातारला येणार आहेत. या काळात सातार्यात तसेच आपल्या वॉर्डमध्येसुद्धा काही नागरीक कोरोनामुळे मृत्यु पावले. याबद्दल त्यांनी दुखः व्यक्त केले असून सर्वांच्या आशिर्वादाने आपण बरे होवून येत असून पुन्हा आपल्या बॉर्डमध्ये तसेच शहरामध्ये कामकाज सुरू करणार असल्याचे श्रीकांत आंबेकर यांनी सांगितले.