स्थैर्य, फलटण : फलटण येथील शंकर मार्केट, फलटण येथे “कोरोना व्हायरस” मुळे लॉकडाऊन काळात गोर गरीब, बेघर, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे लोकांना पोटाला पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने फलटण नगरपालिकेचे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने अखंडितपणे अन्नदान मोहीम अंखड २५ दिवस सुरु ठेवली होती, त्यांचे हे कार्य कौतुकास पात्र आहे, असे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
सदरील उपक्रम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झालेले आहे. एकूण २५ दिवस शंकर मार्केट येथे अन्नदान आपण सुरु ठेवले होते परंतु फलटण शहरात “कोरोना” व्हायरस”चे रुग्ण सापडल्याने प्रशासनाने “अखंडित अन्नछत्र” काही काळासाठी बंद ठेवावे असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आजपासून “अखंडित अन्नछत्र” काही काळासाठी संस्थगित करीत आहोत, असे नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैया), नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी स्पष्ट केेले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राजे गट), शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ सर्व पदाधिकारी, व्यापारी, सभासद व कार्येकर्ते, अन्नदाते, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी, मित्र मंडळी, मा.श्री.अंकुश कोरे (आचारी) व पत्रकार बंधू यांनी “अखंडित अन्नछत्रा”स भरभरुन सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे संयोजकांच्या वतीने नम्रतापूर्वक आभार मानण्यात आले.