नगरसेवक जांभळे यांचे कार्य समाजोपयोगी- आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३१: नगरसेवकपदाच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सोडवण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या सोडवून पडला साजेशे काम नगरसेवक धंनजय जांभळे यांनी केले आहे. जांभळे यांचे कार्य समाजोपयोगी असून यांच्या हातून अखंड समाजसेवा घडेल, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक धंनजय जांभळे यांच्या धंनजयभाऊ या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी नगरसेवक जांभळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहर सरचिटणीस जयदीप ठुसे आदी उपस्थित होते.

जांभळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्र. १६ मध्ये विविध प्रकारची विकासकामे मार्गी लागली आहेत. एक होतकरू आणि कष्टाळू युवक म्हणून परिचित असलेल्या जांभळे यांच्या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रकारचे प्रश्न सुटले आहेत आणि पुढेही सुटतील यात शंका नाही. त्यांनी छापलेल्या दीनदर्शिकेचे मोफत वाटप केले जाते. या दिनदर्शिकेमध्ये दैनंदिन माहिती, सणवार यासह अनेक प्रकारची उपयुक्त माहिती आहे. या दिनदर्शिकेचा चांगला उपयोग लोकांना होईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!