फलटणमध्ये कोरोनाचा हाहाकार; १०७१ जणांचे अहवाल कोरोनाबाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २७ : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यामधील 1071 तर सातारा जिल्ह्यातील 2675 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. फलटण 1071 (23058), जावली 125 (7264), कराड 228 (21537), खंडाळा 135 (10017), खटाव 283 (14908), कोरेगांव 158 (13641),माण 131 (10753), महाबळेश्वर 15 (3926), पाटण 111 (6435), सातारा 343 (34190), वाई 64 (11297 ) व इतर 11 (1000) असे आज अखेर एकूण 158036 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(164), कराड 9 (621), खंडाळा 1 (131), खटाव 8 (402), कोरेगांव 4 (307), माण 2 (201), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (155), फलटण 0(244), सातारा 9 (997), वाई 0 (298) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3562 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!