सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 7 व सातारा येथील 1 असे 8 बाधित आज कोरोना मुक्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 22 : सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  दाखल असणारा  1 असे एकूण 8  कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे मलकापूर ता. कराड येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची ता. कराड येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर   येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी, कराड येथील मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 49 पुरुष  व 45  वर्षीय महिला तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता.माण येथील 25 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत.

आत्तापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!