
स्थैर्य, सातारा, दि. 27 : कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले असताना सातारा जिल्ह्यातही कोरोनाची मगरमिठी अधिकच घट्ट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर मुंबई-पुणेकर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यातील बहुतांशी हे कोरोनाबाधित आढळल्याने मागच्या आठवड्यापासूनच कोरोनाचा गुणाकार या जिल्ह्यात सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई-पुण्याहून परळी खोऱ्यात येणार्यांची संख्याही हजारोंमध्ये आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून परळी खोऱ्यातील बाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होताना दिसत असल्याने परळी खोरे हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट तर होत नाही ना? याच भीतीने परळी भागातील ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. परळी खोऱ्यातील मुंबईहून प्रवास केलेले तसेच त्यांच्या निकट सहवासातील रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने भागात एकच खळबळ उडाली आहे.
परळी खोऱ्यात गेल्या आठवड्यापासून मुंबई-पुण्याहुन येणाऱ्यांची संख्या हे मोठ्या प्रमाणावर आहे त्यातच बुधवारी मिळालेल्या रिपोर्टनुसार परळी खोऱ्यातील कारी (जिमनवाडी) येथील घरातील निकट सहवासातील 2 संशयित तर खडगाव व बुद्रुक येथील संशयित रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परळी भागात एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व बाधित ट्रॅव्हलिंग हिस्ट्री तसेच काहीजण निकट सहवासातील असल्याने कोरोनाची दाहकता अजूनच भागातील ग्रामस्थांना जाणवू लागले आहे.
एकूण आकडेवारी
कूस खुर्द 4
रायघर 3
कूस बुद्रुक 1
खडगाव 2
चाळकेवाडी 1
कारी (जिमनवाडी) 4
एकूण बाधित 15