टीव्ही मालिकेच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकरांची प्रकृती चिंताजनक, ‘आई माझी काळूबाई’च्या सेटवर 27 जणांना कोरोनाची लागण


 

स्थैर्य, दि.२१: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. सातारा येथील फलटण तालुक्यात ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. या मालिकेच्या सेटवर तब्बल 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना 16 सप्टेंबर रोजी वाई येथील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज समोर आलेल्या माहितीनुसार, आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होते आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुंबईहून काही दिवसांपूर्वी गाण्याचे शुटिंग करण्यासाठी सुमारे 20 ते 22 लोक साताऱ्यातील फलटण येथे गेले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे.

या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत अभिनेत्री आशालता वाबगावकरांचीही महत्त्वाची भूमिका आहे. साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचे शुटिंग सुरू होे. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचे शुटिंग सुरू होते. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!