कोरोनाचा कहर! फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये दुसरा लॉकडाउन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, लंडन, दि.१ : युरोप, अमेरिकेत कोरोना विषाणूची
दुसरी लाट आली आहे. फ्रान्सनंतर आता इंग्लंडनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे.
पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुस-या लॉकडाउनची घोषणा केली आहे. थंडीमध्ये
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ५ नोव्हेंबर
ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाउन जाहीर केला आहे.
लॉकडाउनमध्ये हॉटेल, दुकाणं आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली
आहेत.

बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक
व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची
विनंती व्हिडीओत करण्यात आली आहे. चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाउन
संपवायचा किंवा वाढवायचा हे पाहिलं जाईल, असेही ट्विटमध्ये म्हटलेय.

जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही
कारणास्तव घरातून बाहेर निघू नये. शक्य असल्यास घरुनच काम करावे. गरज
नसल्यास प्रवासही टाळा, अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली
आहे.

यूरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा
प्रादुर्भाव वाढत चालाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउनची
घोषणा करण्यात येत आहे. गुरुवारी फ्रान्समध्ये लॉकडाउन घेण्यात आला आहे.
एपीने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिसमध्ये आणि आसपास असणा-या परिसरातील
वाहतूक कोंडी किमीमध्ये मोजल्यास जवळपास ७०० किमी लांब वाहतूक कोंडी झाली
होती. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हा लॉकडाउन एक महिन्यांसाठी लागू असणार
आहे. यामुळेच गुरुवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन प्रभावी होण्याआधी सामान
खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. याशिवाय विकेण्ड आल्यानेही अनेक
लोक इतर ठिकाणी असणा-या आपल्या घऱी जाण्यासाठी निघाले होते. यामुळेच ही
स्थिती निर्माण झाली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!