स्थैर्य, सातारा, दि.०३: राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना’ सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. स्पर्धेत सहभागी गावांना विविध २२ निकषांवर ५० गुण देण्यात येणार आहेत.