कठोर भूमिका, कारवाई व अंमलबजावणीशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही : कृषी मंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मालेगाव, दि. २९ : गेल्या दोन दिवसापासून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदर वाढला आहे. कोरोनाच्या महामारीत आपण चांगली माणसे गमावली असून ही महामारी रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर भुमीका, कारवाई व अंमलबजावणी केल्याशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील संशयित व बाधित रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणास विरोध केल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली, याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महानगरपालीकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शैलेश निकम, अतिरीक्त शल्य चिकीत्सक डॉ.हितेश महाले, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे, डॉ.शुभांगी अहिरे, डॉ.पोतदार आदि उपस्थित होते.

तालुक्यात सुरवातील कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या 38 गावांची संख्या कमी होवून आज 19 वर आल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, या 19 गावातील ज्या ग्रामदक्षता समित्या आहेत त्यातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या गावातील संशयित रुग्ण गावभर फिरणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच बाधित रुग्णाच्या घराची प्रत्यक्ष पडताळणी करून गरजेनुसार त्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. त्याने विरोध केल्यास त्यास थेट मालेगाव येथील कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात यावे. अशा रुग्णांकडून विलगीकरणासाठी प्रतिसाद न मिळाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शहरातील रुग्ण संख्या नियंत्रीत ठेवण्यासाठी छोटी प्रतिबंधी क्षेत्र (मायक्रो कंटेटमेंट झोन) तयार केल्यास नागरिकांची गैरसोय टाळण्यासह अशा प्रतिबंधीत क्षेत्रात सेवा सुविधा देण्यासही मदत होणार असल्याचे मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याची खंत व्यक्त करत शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!