साखरवाडी ग्रामपंचायतीकडून स्वातंत्र्यदिनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान


स्थैर्य, फलटण : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून साखरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रशासकीय सेवा बजावणार्‍या अधिकार्‍यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी शिक्षणाधिकारी पोपट पांडुरंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक रमेश महादेव भोसले, परशुराम राजाराम कदम यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे होतेे.

तसेच यावेळी साखरवाडी माध्यमिक विद्यालयातील गुणवतं विद्यार्थी दिशा शिवदत्त गोसावी, श्‍वेता महेश भोसले, ज्ञानेश्‍वरी संजय जगदाळे, सिद्धी राजेंद्र माडकर  यांचा तसेच सरपंच कालावधीत 15 कोटीची विकास कामे केल्याबद्दल विद्यमान सरपंच विक्रम भोसले यांचा, तसेच ग्रामपंचायत व परिसरातील सर्व आशा वर्कर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास साखरवाडी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व शिक्षक वर्ग आदींची उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!