स्थैर्य, सातारा, दि. 27 : गेल्या तीन महिन्याच्या पासून संपूर्ण देश कोरोना विरोधात एकजुटिने लढा देत आहे यातून सर्वच देश वासियांचे संरक्षण करण्यासाठी पोलिस, डॉक्टर, नर्सेस, स्वछता कर्मचारी कोणतीही जीवाची पर्वा न करता लढत आहेत. त्यांच्या कार्याला सर्वच स्तरातून पाठबळ मिळू लागले आहे, त्यांच्या या कार्याला आणखी बळ मिळावे यासाठी जावली तालुक्यातील उदयनमुख संगीतकाराने आपल्या संगीतातून त्यांच्या कार्याला पाठिंबा रूपी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनेक नावाजलेल्या मराठी चित्रपट व अल्बम यांना संगीत दिलेल्या आनेवाडी ता. जावली येथील संगीतकार प्रशांत दत्तात्रय फरांदे याने या गाण्याची शब्द रचना मित्र विशाल जमदाड़े सह केली असून गाण्याचे गायक प्रेम हे असून या गिताला संगीत प्रशांत फरांदे याचे असून मराठी सिरियल मधील नावाजलेले कलाकार लागिर झाल जी मधील सूरज बाबर, मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील राजू बावडेकर, जावू द्या ना बाळासाहेब मधील नागेश मोरवेकर, तुझ्यात जीव रंगला या मधील कलाकार यांनी यात आपली कला सादर केली असून या लॉकडाउनच्या काळात वर्क फॉर्म होम मधे “चला लढु या” या व्हिडीओ अल्बममधे काम केले असून मराठी चॅनल मायबोली वर हा अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारानी खऱ्या अर्थाने देश सेवेचे काम करीत असलेल्या कोरोनाच्या या योध्याना आपल्या गाण्याच्या माध्यमातून पाठबळ व त्यांचे धैर्य वाढवीण्यासाठी अल्बम केला असल्याचे प्रशांत फरांदे याने सांगितले, ग्रामीण भागातुन आलेल्या सर्व कलाकारानी आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करीत “चला लढु या” मधून आम्ही देखील सर्वांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले आहे.