
स्थैर्य, फलटण, दि. १३ : फलटण तालुक्यातील तरडगाव गावामधील असणाऱ्या महानुभाव पंथीय मठामधील सुमारे ३० जणांचे अहवाल हे कोरोनाबाधित आलेले आहेत. तरडगावमध्ये आवश्यक त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करून कोरोनाचा फैलाव होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.