कोरोनाचा विळखा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती, संपर्कातील लोकांना तपासणी करण्याचे अवाहन


 

स्थैर्य, मुंबई, दि.१८: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतानाच दिसत आहे. राज्यातील सामन्य नागरिकांसोबतच नेते मंडळींनाही कोरोनाने विळखा घातल्याचे दिसत आहे. याच कोरोना संकटामुळे विधानसभेचे पावसाळी अधिवेशनय दोन दिवसांतच आटोपण्यात आले होते. मात्र तरीही यामुळे राज्यातील आमदारांना याचा फटका बसताना दिसतोय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.’ असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान उपचारांसाठी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह खासदार प्रा. संजय मंडलिक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोल्हापूर महापालिकेतील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, सीपीआरमधील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी अनेकांनी कोरोनावर मात केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!