कोरोना व्हॅक्सीन : ‘मी आणि माझ्या स्टाफने सीरम इन्स्टिट्यूटची लस घेतली,’ शरद पवार यांची माहिती


 

स्थैर्य, पुणे, दि.३: ऑक्सफोर्डच्या कोरोना व्हॅक्सीनचे भारतात पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटकडून उत्पादन होणार आहे. याच सीरम इनस्टिट्यूटला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज भेट दिली. यावेळी शरद पवारांनी तिथे तयार करण्यात आलेली कोरोना लस घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतू, पत्रकार परिषदेत पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘मी सीरम इनस्टिट्यूटची कोरोनावरील लस घेतल्याचे काही लोक म्हणत आहेत. पण, ते खरं नाही. त्यांच्याकडे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे, ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे. कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल, अशी माहिती पवारांनी यावेळी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!