
स्थैर्य, दि.२: मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. दोघांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. गुरुवारी ट्रम्प यांच्या सीनियर एडवाइजर होप हिक्स संक्रमित आढळल्या होत्या. यापूर्वी त्यांनी राष्ट्राध्यक्षांसोबत अनेक दौरे केले होते. यानंतर, राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीची देखील कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला.
दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट 13 दिवसांनंतर आहे. यात सहभागी होणे आता ट्रम्प यांना अवघड जाईल. ट्रम्प हे जास्तीत जास्त ठिकाणी मास्क घातलेले दिसले नाही. अने वेळा त्यांनी याची खिल्लीही उडवली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हाइट हाउसच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये ट्रम्प म्हणाले होते – मी माझ्या एडवाइजरच्या या गोष्टीशी सहमत नाही की, व्हॅक्सिनपेक्षा जास्त गरजेचे मास्क आहे.
दूसऱ्या डिबेटमध्ये सहभाग घेणे कठीण
दूसरी प्रेसिडेंशियल डिबेट 15 अक्टोबरला होणार आहे. म्हणजे केवळ 13 दिवस शिल्लक आहेत. क्वारंटाइन पीरेड 14 दिवसांचा असतो. यानंतरही टेस्ट केली जाईल. यामुळे ट्रम्प या डिबेटमध्ये सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे.
दोन वेळा मास्कमध्ये दिसले
ट्रम्प हे केवळ दोन वेळाच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून दिसले. 12 जुलैला ते वॉशिंगटनच्या वॉल्टर रील मिलिट्री हॉस्पिटलच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हाच त्यांनी निळ्या रंगाचा मास्क घातला होता. गेल्या आठवड्यात ट्रम्प सुप्री कोर्टाचे दिवंगत जस्टिस गिन्सबर्ग यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी गेले होते. मेलानियाही सोबत होत्या. तेव्हाच दोघांनी मास्क घातले होते.