स्थैर्य, फलटण, दि. १८: सध्या फलटण शहरात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ब्रेक द चेनचे आदेश पारित केलेले आहेत. तरिही फलटणमध्ये विनाकारण बाहेर फिरणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. या वर आळा घालण्यासाठी फलटण नगरपरिषद व फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विनाकारण बाहेर फिरणार्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. एकुण ५० जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर पाच जणांची कोरोना चाचणी ही कोरोना पॅाझीटिव्ह आलेली आहे. त्या पाच जणांना सक्तीने संस्थामक विलीगीकरण करण्यात आलेले आहे व दोघाजणांवर मास्क न घातल्याबाबत कारवाई करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
या वेळी बोलताना मुख्याधिकारी प्रसाद काटकर म्हणाले की, ब्रेक द चेनच्या आदेशाचे जे नागरिक पालन करित नाहित. व बिनदिक्कत पणे बाहेर फिरताना आढळून येत आहेत त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. व त्या मध्ये जे पॅाझीटिव्ह येतील त्यांना सक्तीने संस्थामक विलीगीकरणात दाखल करण्यात आलेले आहे व या पुढेही येणार आहे.