सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी दि. 22 पर्यंत करा; शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठकीत निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

फलटण : सरडे ता. फलटण येथे शाळा व्यवस्थापन समिती बैठकीत मार्गदर्शन करताना  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, यावेळी उपस्थित गटशिक्षणाधिकारी  रमेश गंबरे, केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे, सरपंच संजय धायगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  महेंद्र भोसले, मुख्याध्यापक  भरत गरगडे,  विठ्ठल साळवी व समिती सदस्य.

स्थैर्य, फलटण, दि.१९ : शालेय शिक्षण विभागाच्या दि. 10 नोव्हेंबरच्या परिपत्रकाप्रमाणे इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यासाठी जिल्हयातील शाळांमध्ये पूर्वतयारी करण्यात येत असून आगामी 2 दिवसात शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका होणार आहेत. आरोग्य विभागाच्या मदतीने इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शिक्षकांची आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी दि.22 पर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंगळवार दि. 17 रोजी सरडे, ता. फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूलमध्ये आयोजित शाळा व्यवस्थापन समिती बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र भोसले, संचालक सुखदेव बेलदार, सरपंच संजय धायगुडे, श्रीहरी पाटील, बापूराव जगताप, मुख्याध्यापक भरत गरगडे यांच्यासह समिती सदस्य व पालक उपस्थित होते.

सरडे ता.फलटण येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी शाळा व्यवस्थापन समिती बैठकीत पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती वगैरे सर्व घटकांना सविस्तर सूचना दिल्या. दरम्यान शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना स्थानिक प्रशासनाची जबाबदारी म्हणून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आणि कोविड-19 ची मोफत चाचणी करण्याबाबत आदेश दिले आहेत, तर बुधवार दि. 18 रोजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी सर्व क्षेत्रिय अधिकार्‍यांची ऑनलाईन बैठक घेणार आहेत.

डॉ. सुमेध मगर यांना युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे विशेष अभ्यास शाखेत प्रवेश

शिक्षणाधिकारी म्हणाले, शासन परिपत्रकात सविस्तर मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत, त्यानुसार जिल्हयातील इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या बैठका पुढील दोन दिवसात घेवून शाळा सुरु करण्याची पूर्वतयारी आणि शाळा सुरु झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. पालकांची लेखी संमती असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

शनिवार दि. 21 नोव्हेंबर पर्यंत सर्व शाळांनी पालकांची लेखी संमतीपत्रे प्राप्त करुन घेवून शालेय दप्तरी जमा करुन ठेवायची आहेत. सोमवार दि. 23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 वी ते 12 वीच्या गणित, विज्ञान व इंग्रजी या सारख्या महत्वाच्या विषयांचे प्रत्यक्ष अध्यापन सुरु होणार असले तरी, जे विद्यार्थी शाळेत येवू शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन अध्यापनही सुरु राहणार आहे. उर्वरित इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या वर्गाचे अध्यापनही पुढील शासन सुचना येईपर्यंत ऑनलाईन पध्दतीनेच सुरु राहणार आहे. प्रत्यक्ष सुरु होणार्‍या शाळांना दोन सत्रात किंवा एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा पर्याय देण्यात आला आहे, तसेच प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी बसेल अशी बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांना या बाबत माहिती विहित प्रपत्रात गटशिक्षणाधिकारी यांचेकडे शनिवार दि. 21 नोव्हेंबर पर्यंत देण्याच्या सूचना दिल्या असून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती संकलीतरित्या राज्यस्तरावर पाठविण्यात येणार आहे.

शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकांमध्ये दि. 10 नोव्हेंबरचरचे शासन परिपत्रकाचे प्रगट वाचन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यास अनुसरुन पालकांचे संमतीपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी शाळास्तरावर वर्गशिक्षकांना संबंधीत पालकांचीही ऑनलाईन बैठक घ्यावी लागेल. दरम्यान दि. 22 नोव्हेंबर पर्यंत ठ.ढ.झ.उ.ठ. चाचणी करणे सर्व शिक्षकांना बंधनकारक असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची धावपळ सुरु झाली आहे.

ग्रॅच्युइटीची रक्कम, थकीत पगार, रजेचा पगार आमचा आम्हाला द्या; कारखाना प्रशासन व नेतेमंडळी यांच्याशी कोणतेही वैर नाही

मंगळवारी जिल्हयातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक दोन टप्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांनी घेतली. बैठकीस उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलावडे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. या बैठकीत जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

ठळक मुद्दे


1. पालकांच्या संमतीपत्रावरच विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती अवलंबून.

2. कोविड चाचणी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांवर बंधनकारक.

3. सॅनिटायझर, थर्मल गन, पल्स ऑक्झीमीटरची व्यवस्था शाळेने करणे आवश्यक.

4. शाळांचे निर्जुतीकीकरण तसेच स्वच्छतेविषयक सर्व सुविधांची पूर्तता करणे शाळांची जबाबदारी.

5. शारिरीक अंतर ठेवण्यासाठी एका बाकावर एकच विद्यार्थी.

6. मास्क घालुनच पाल्यांस पालकांनी शाळेत पाठविणे अपेक्षीत.

7. परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध.

8. विद्यार्थ्याने पुस्तके, वही, पेन, पेन्सिल इ. साहित्याची अदलाबदल करणेस मज्जाव.

9. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!