स्थैर्य, फलटण, दि.१८: वाढत्या रुग्णांचा विचार करता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल याठिकाणी दहा बेडचे सुसज्ज क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आलेले आहे.या सेंटरसाठी स्वरा स्टील फर्निचर सासकल चे लहू शिवाजी सावंत यांनी दहा बेडची व्यवस्था केली आहे.तसेच याठिकाणी सुधीर सोमनाथ दळवी यांकडून 10 लिटर सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला आहे.याठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यासंदर्भात गावचे नागरिक व या शाळेचे शिक्षक राजेंद्र आकोबा सस्ते व मौजे सासकल व भाडळी बुद्रुक खुर्दचे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी पुढाकार घेतला आहे. या सेंटरच्या उभारणीमध्ये आशा वर्कर्स दळवी मॅडम, अमित सुखदेव घोरपडे, सचिन मदने, श्रीकांत सुतार, आदित्य मुळीक यांनी मदत केली.
फलटण तालुक्यातील झिरपवाडी, वाखरी, आदर्की बुद्रुक, जिंती, साठे, सासकल, हिंगणगांव, शेरे शिंदेवाडी ही 8 गावे दि. 11 ते दि. 20 मे दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) म्हणून घोषित केली आहेत. प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार संपूर्ण सासकल गावामध्ये अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार / व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावचे सरपंच उषादेवी फुले व उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन नामदेव मुळीक, लता विकास मुळीक, हणमंत गंगाराम मुळीक, ग्रामसेवक अंगराज जाधव त्यांनी तातडीने ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेऊन जनजागृतीसह कठोर निर्बंध लावून त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये विविध मंडळांचे कार्यकर्ते, दुकानदार, महिला बचत गट, सासकल जनआंदोलन समितीचे शिवाजी हरिभाऊ मुळीक, विनायक नारायण मदने, महेश मदने या सर्वांनी आपले आपल्या पातळ्यांवर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.वाजेगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रागिनी विनायक मुळीक यांनीही जनजागृतीसह आवश्यक ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.