स्थैर्य, सातारा, दि. ११ : सातारा येथील रविवार पेठेतल्या भाजी विक्री करणायाचा दि.1रोजी मृत्यू करोनामुळे झाला होता.त्यांचे सर्व कुटूंब खावली येथे कोखोन टाइन झाले आहे. त्यांच्या कुटूंबातले बहुतांशी जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.रात्री त्यांच्यापैकीच त्यांचे बंधू जे सातारा आडत असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रविवार पेठेतल्या स्वातंत्र सैनिक नगरात आणखी एक करोना बाधित झाला आहे. दरम्यान, आडत असोसिएशनचे अध्यक्ष बाधित झाल्याने त्यांच्या संपर्कात कोणी आले नसल्याचे आडत व्यापारी सांगत आहेत. मात्र, ते चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान, गोडोली येथील मंगल कॉलनीतील थायरॉईडचा त्रास असलेल्या करोना बाधित सारीने 65 वर्षीय पुरुष मृत्यू झाला आहे. त्यामुळे शाहूनगर येथे नव्याने मायक्रो कंटेंटमेंट झोन करण्यात आला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात जे दोन भाऊ आडत व्यापारी आहेत. त्यातील जो लहान भाऊ हा दि.1रोजी करोनाच्या बाधेमुळे दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांचा जेव्हा अहवाल आला त्याच दिवशी त्यांच्या कुटूंबातले खावली येथे कोरोन टाइन झाले आहेत. त्यात त्यांच्या पत्नीचा दोन्ही मुलांचा, बाजूच्या कुटूंबातले यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून ते उपचार घेत आहेत. त्यातच आता त्यांचे थोरले बंधू हे ही खावली येथे कोरोन टाइन असताना रात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे स्वातंत्र सैनिक नगरात आणखी एकाने वाढ झाली आहे. दरम्यान, आडत असोसिएशनच्या अध्यक्षांच्या कोणी ही संपर्कात आले नसल्याचे आडत असोसिएशनच्या काही सदस्यांनी सांगितले. मात्र, कोरोनाची धास्ती दिसत आहे.
गोडोलीतल्या वयोवृद्धचा मृत्यू शाहूनगर गोडोली येथील मंगल कॉलनीत राहणारे 65 वर्षाचे वयोवृद्ध यांचा कोरोना सारीने मृत्यू झाला. त्यांना थायरॉईडचा त्रास गेल्या कित्येक दिवसापासून सुरू होता.त्यांच्यावर उपचार ही सुरू होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटूंबातले चार जण कोरोन टाइन करण्यात आले आहेत. त्यांच्या मृतदेहावर करोनाच्या नियमानुसार कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शहरात नव्याने एक मायक्रो कंटेंटमेंट झोन तयार करण्यात आला आहे.