स्थैर्य, सातारा, दि. २७ : डोंगरमाथ्यावरील धावली ता. सातारा या गावात मुंबई वरून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा धावलीत शिरकाव झाल्याने गावासह परिसरात भितिचे वातावरण पसरले असुन गावाच्या सिमा प्रशासनाने बंद केल्या आहेत.
मुंबई दहीसर येथुन दि. २० जुन रोजी धावली गावात दाखल झालेल्या एका कुटुंबातील ४५ वर्षिय महीलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्या कुंटुबातील ४ व अलवडी येथील वाहनचालक यांनी एका गाडीतुन एकत्रीत प्रवास केला होता. त्या कुंटुंबाला धावली ग्रामस्थांनी होम कॉरंटाईन केले असुन अलवडी येथेही वाहन चालकाला होम कॉरंटाईन केले आहे त्यामुळे गावासह परिसराला धीर मिळाला आहे.
आठ दिवसापुर्वी मुंबई दहीसर येथुन गावी आल्यावर त्या महिलेला जुलाब उलटी असा त्रास होऊ लागल्याने त्यांनी गावातील प्राथमीक आरोग्य उपकेंद्रांत तात्पुरते उपचार घेतले होते, मात्र फरक पडत नसल्याने व त्रास जास्त जाणवु लागल्याने तिला गुरुवारी १०८ रूग्णवाहीकेतुन सिव्हील रूग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी सायंकाळी महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आल्याने धावली गावाला धडकी भरली असुन परिसरात भितिचे वातारण पसरले आहे. शनिवारी सकाळी प्रशासकीय आधिकारी तलाठी विकास माळी, ग्रामसेवक विशाल कांबळे, आरोग्य सेविका गितांजली नलावडे, आरोग्य सहाय्यक एस.डी.गवते, ए.जी.बोधे, महेश भोसले, सविता डुमणे, सरपंच विष्णु सुर्वे, उपसरपंच दिनकर जाधव, आदींनी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. आरोग्य विभागाने गावातील नागरीकांच्या प्राथमिक तपासण्या केल्या असुन बाधीताच्या कुंटुबातील तिन सदस्य व वाहनचालक यांना तपासणीसाठी जिल्हा रुगणालयात पाठविण्यात येणार असल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली आहे.