जिल्हा अनलॉक होत असताना कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०२ : जिल्हा अनलॉक होत असताना कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. एका महिन्यात तब्बल तीन हजार बाधित वाढले असून बळींची संख्या सुद्धा 85 ने वाढली आहे. त्यामुळे यापुढे जिल्हय़ातील नागरिकांना मोकळीक दिली असली तरी कोरोनाला हद्दपार करायचे असल्याने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिल्हय़ातील लॉकडाऊन उठवल्याने शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोरोना संकटाचे भान राखत मुस्लीम बांधवांनी बकरी ईदचा सण घरीच साजरा केला. टेस्ट वाढवल्यामुळे शुक्रवारी रात्री आलेल्या 228 जणांच्या बाधित अहवालामुळे जिल्हय़ाला हादरा बसला आहे. जिल्हय़ात वेगवेगळय़ा गावात होणाऱ्या कोरोनाच्या साखळय़ा तोडण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडण्याचे या आठवडय़ात प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये ज्येष्ठांपासून तरुणांचाही समावेश आहे. आतापर्यत 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिह्यातील सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहे. बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न्शील असले तरी बेड अपुरे पडत आहेत. अनलॉक सुरु केल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत होते. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात नव्याने 169 जण बाधित झाले आहेत. रात्री आणि आजच्या कोरोना बाधिताच्या आकडय़ात साताऱयाचा कराड पाठोपाठ नंबर लागला आहे. ऑन फिल्ड असणाऱ्या कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केली कोरोनावर मात

कोरोना हे मानवी संकट जगावर ओढवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत लढणे हेच सूत्र अंगी बाणत जनतेसाठी, रयतेसाठी झगडत होत्या कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे. त्यांना कोरोनाने गाठले. परंतु कोरोनारुपी राक्षसाला त्यांनी हरवून पुन्हा कराडकरांना नव्या उमेदीने अवघी कराडनगरी कोरोनामुक्त करण्याचे ध्येय घेवूनच त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांचे कौतुक होत आहे. उपचार घेत असतानाही त्यांनी कराड शहर कसे कोरोनातून बाहेर काढता येईल याचा आढावा घेत होत्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!