म्हसवड शहरात कोरोनाचा पहिला बळी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


म्हसवड शहरात होणारी नागरीकांची गर्दी

स्थैर्य, म्हसवड, दि. १५ : म्हसवड शहरातील मध्यभागात १८ दिवसांपुर्वी कोरोनाचा सापडलेला कोरोनाचा पहिल्या रुग्णाचा आज दुर्देवी अंत झाल्याने शहरात भितीचे ढग निर्माण झाले आहेत, कोरोनामुळे ज्या व्यक्तीचा मृत्यु झाला आहे ती व्यक्ती शहरातील अजातशत्रु व्यक्तीमत्व म्हणुन सर्वदुर परिचित असल्याने शहरवासीयांतुन हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील हा पहिला बळी असल्याने म्हसवडकर जनता पुरती हादरली आहे. दरम्यान शहरातील पहिला कोरोना बाधित सापडलेला रुग्णाचा १८ दिवसांपुर्वी अहवाल हा पाझिटीव्ह आल्यानंतर म्हसवडकर नागरीक व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीनंतर म्हसवड शहर हे १४ दिवसांकरीता पुर्णतह: लॉक करण्यात आले होते. त्यानंतरच सोमवार दि.१३ पासुन म्हसवड शहर पुर्ववत सुरु झाले असतानाच आज शहरातील पहिला रुग्ण दगावल्याने म्हसवडकर जनता हादरली आहे.

दि.१५ रोजी कोरोनामुळे दगावलेल्या ५४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाने त्याच्या निकटवर्तीय ९ जणांना क्वारंन्टाईन केले होतो त्यापैकी ५ जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याने शहरात कोरोना रुग्णांची संख्या ६ वर पोहचली होती त्यामुळे प्रशासनाने व म्हसवडकर नागरीकांनी खबरदारी म्हणुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु पाळला होता. त्यानंतर सोमवार दि. १३ पासुन शहर पुर्ववत सुरु झाले असतानाच आज अचानक शहरात कोरोनाचा बळी गेल्याचे वृत्त धडकल्याने अनेकांना धडकी भरली आहे.

शहरात होतेय रेकॉर्ड ब्रेक गर्दी –लॉकडाउन च्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे यापुर्वी प्रशासनाने वारंवार जाहीर केले असताना म्हसवड शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत, तर उद्या पासुन संपुर्ण जिल्ह्यात १० दिवसांकरीता पुर्णपणे लॉकडाउन होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यामुळे म्हसवड शहरात खरेदीसाठी अक्षरशा नागरीकांची झुंबड उडाल्याचे चित्र असुन ही गर्दीच कोरोनाला वर्दी देणारी ठरत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!