
![]() |
बोंबाळे गावची सीमा सील करताना अधिकारी .( छाया : समीर तांबोळी ) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. 15 : भाग्यनगर (बोंबाळे ता खटाव) येथे सोमवारी रात्री एक 29 वर्षीय युवक कोरोना बाधित सापडल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्याअनुषंगाने भाग्यनागर (बोंबाळे ) येथे कडक लॉक डाउन पाळण्यात आले होते. मुंबई पुण्यावरून आलेल्या व्यक्तींना स्व मालकीच्या घरात व प्राथमिक शाळेत कोरंटाईन करण्यात आले आहे. संबंधित रुग्ण स्थानिक रहिवासी असून स्व मालकीच्या घरातच पत्नी ,आई व मूलासंमवेत राहात आहे. परिसरातील छोटीमोठी शेतीची कामे करुन आपला उदरनिर्वाह सुरू असून गत आठ दिवसापासून खोकला व पोटदुखीचा त्रास होउ लागलयाने स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व वडूज च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने वडूज च्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.मात्र प्रकृती सुधारत नसल्याने ग्रामीण रुग्णालयच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे हालविण्यात आले व तेथे घशाचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, तहसीलदार डॉ अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली चव्हाण आदीसह कोरोना कमेटीतील अधिकाऱ्यांनी गावास भेट देत गावच्या सीमा सील केल्या. व संपर्कातील पत्नी, मुलगा, खासगी डॉक्टर, एक फळविक्रेतासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.