कोळकी येथे मुंबई वरून आल्यानंतर मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा करोना रिपोर्ट पॉसिटीव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २१ : काल रात्री प्राप्त अहवालानुसार क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 4 (  चिंचनेर लिंब ता.सातारा येथील मुंबई वरून आलेला 30 वर्षीय युवक, गादेवाडी ता. खटाव येथील 30 व 32 वर्षीय पुरुष तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाच्या निकट सहवासातील 9 वर्षाची मुलगी)  , वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 3 ( म्हासोली ता. कराड येथील 22 वर्षीय युवती  व 28 वर्षीय पुरुष तसेच मेरुएवाडी येथील 33 वर्षीय पुरुष), उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 (कोळकी येथील 74 वर्षीय पुरुष व फरडवाडी, ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष), ग्रामीण रुग्णालय, वाई येथे कवठे ता. खंडाळा येथील 33 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल म्हासोली ता. कराड येथील  50 वर्षीय निकट सहवासित अशा  एकूण 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी फलटण येथील 74 वर्षीय पुरुषाचा 18 रोजी मुंबई वरून प्रवास करून आल्यानंतर  मृत्यू झाला होता त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 181 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 79 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 4 रुग्ण आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!