सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांना मुंबई/ पुणे महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये व जंबो कोवीड सेटंरमध्ये बेड उपलब्ध करुन दयावेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दौलतनगर दि.०३ : सातारा जिल्हयातील शासकीय रुग्णालये तसेच शासनाने अधिग्रहण केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे मर्यादित बेड आहेत.जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड अभावी अनेक रुग्णांचे मृत्यूदेखील झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई/ पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी व महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये तसेच शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये सातारा जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे आवश्यक बेड उपलब्ध करुन दयावेत अशी आग्रही विनंती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.

सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. जिल्हया मध्ये शासकीय रुग्णालये तसेच शासनाने अधिग्रहण केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे मर्यादित बेड आहेत.कोरोना रुग्णांना आवश्यक ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड जिल्हयातील कार्यरत कोरोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड मिळाले नाहीत म्हणून अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना जिल्हयात घडल्या आहेत. कोरोना रुग्णांचे सातारा जिल्हयातील वाढते प्रमाण पहाता विलंब न लावता आपण सातारा जिल्हयाकरीता जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंर सुरु करण्यास तात्काळ मान्यताही दिली आहे. त्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरचे कामांस सुरुवात देखील करण्यात आली मात्र या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरचे काम पुर्ण होण्यास किमान ०१ महिन्याचा कालावधी लागणार आहे.त्यामुळे रुग्णांना मोठया संकटाला सामोरे जावे लागत आहे. असे ना.शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे निदर्शनास आणून दिले आहे.

दरम्यान मुंबई शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळू हळू कमी होत आहे.मुंबई/ पुणे येथे शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी व महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये तसेच शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये सातारा जिल्हयात वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध करुन देणेबाबत मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व सार्वजनीक आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी शासनाच्या तसेच मुंबई/ पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास आदेश दयावेत अशी ना.शंभूराज देसाईंनी आग्रहाची नम्र विनंती मुख्यमंत्री व सार्वजनीक आरोग्यमंत्री या दोघांकडे केली आहे.

ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड अभावी सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांची  होणारी हेळसांड पहाता मी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व  सार्वजनीक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता मुंबई/ पुणे येथे महानगरपालिकेंच्या रुग्णांलयामध्ये किंवा शासनाने व मुंबई/ पुणे महानगरपालिकेंने उभारलेल्या जंबो कोवीड फॅसिलिटी सेटंरमध्ये ऑक्सीजन व व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध करुन दयावेत असे लेखी पत्रच दिले आहे.सातारा जिल्हयातील कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे उपचार वेळेत मिळणेकरीता आम्ही प्रयत्नशील आहोतच त्याचबरोबर वरीलप्रमाणे जिल्हयातील कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय करणेकरीता व्यक्तीश: माझा राज्याचे मुख्यमंत्री व सार्वजनीक आरोग्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!