जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संयुक्तरीत्या घेतला आढावा


स्थैर्य, बीड, दि. ०९: केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील कोरोना वरील उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील बीड जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नियुक्त पथकातील सदस्य आज बीड जिल्ह्यात दाखल झाले.

केंद्रीय पथक हे जिल्हा, राज्य आणि केंद्र यामधील समन्वय साधणार असल्याचे  पथकातील सदस्यांनी  प्रामुख्याने सांगितले. जिल्हा यंत्रणेस मदत करणे ही भूमिका राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय पथकातील डॉ. श्रीमती रक्षा कुंडल,  डॉ. अरविंद कुशवाहा यांनी जिल्हाधिकारी रविंद्र  जगताप यांच्या सह जिल्ह्यधिकारी कार्यालयातील बैठकीत संयुक्तरित्या कोरोना बाबत उपाययोजनांचा शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून माहिती आणि आढावा घेतला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती

पहिल्या सत्रात त्यांनी जिल्हा रुग्णालयासह कोविड हॉस्पिटल आणि कोरोना केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली

यावेळी केंद्रीय पथकातील डॉ. श्री अरविंद कुशवाहा, डॉ.श्रीमती रक्षा कुंडल यासह जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रकाश आघाव पाटील,  उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुर्यकांत गिते,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार,  आरोग्य  विभाग, स्वारातीग्रा वैद्यकीय महाविद्यालय आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हयात ज्या उपयाययोजना चालू आहेत त्या पाहणे व सुचना करणे हे पथक करत असून आज जिल्हयामध्ये किती बेड, ऑक्सीजन असलेले बेड, रुग्ण संख्या वाढत राहिली तर यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी बाबत माहिती घेतली.

डॉ. श्री. कुशवाहा व  डॉ . श्रीमती कुंडल यांनी सांगितले की, ऑक्सीजन युक्त बेड, आयसीयु, व्हेंटिलेटर आज किती मागणी आहे आणि याचप्रमाणे जर रुग्ण संख्या वाढत राहिली तर एक महिन्यानंतर किती ऑक्सीजन युक्त बेड, आयसीयु, व्हेंटिलेटर लागतील यांची चाचपणी करणे गरजेचे आहे. तसेच मनुष्यबळाची पण आवश्यकता लागेल असे सांगितले.

यापुढे येणाऱ्या काळात जिल्हयात हजारच्या प्रमाणात रुग्ण वाढले तरी जिल्हा प्रशासनाकडे तेवढी साधन उपलब्धता गरजेचे आहे.

कोरोना वार्डातील कर्मचारी यांना येणाऱ्या काळात 40-50 सेल्सिअस मध्ये पीपीई किट घालून काम करणे अत्यंत कठिण असल्याचे डॉ.रक्षा कुंडल यांनी सांगितले. प्रत्येक वार्ड सुसज्ज करणे आदी बाबतीत सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप  यांनी जिल्हयात सुरु असलेल्या उपयायोजना बाबत माहिती दिली. जिल्हयात राज्य शासनाच्या लॉकडाऊन बाबत निर्बंधाच्या आगोदर जिल्हयात 10 दिवसाचा लॉकडाऊन लावल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालय येथे Rt-pcr तपासणी सुविधा निर्माण करण्यासाठी कार्यवाही पूर्ण झाली असून लवकरच कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितले

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार यांनी  आरोग्य विभागातील मंजूर पदे आणि भरलेली पदे आदी बाबत माहिती दिली

याप्रसंगी कोविड केअर सेंटर येथे सुरु होत असलेले ऑक्सिजन युक्त बेड बाबत केंद्रीय पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

केंद्रीय पथकाचे बीड येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी पहिल्या सत्रात जिल्हा रुग्णालय , जिल्हा कोविड हॉस्पिटल आणि को वेड केअर सेंटर येथे भेट दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि रुग्णांकडून माहिती घेतली.


Back to top button
Don`t copy text!