कोरोना संकटात एसटी कामगारांना सोडले वार्‍यावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


राज्य सरकारच्या आदेशाला महामंडळाकडून केराची टोपली : वंचितचा आंदोलनाचा इशारा

स्थैर्य, सातारा, दि. 20 : देशाची जनतेवर कोरोनासारख्या भयंकर संकटाला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही आस्थापनाने कर्मचारी वर्गाला वार्‍यावर सोडू नये, अशा सक्त सूचना केंद्र आणि राज्य सरकारने दिल्या आहेत. मात्र, राज्यातील एसटी महामंडळाने मात्र, या सुचनेला केराची टोपली दाखवून कर्मचार्‍यांची सेवा स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णचाचा वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने तीव्र निषेध केला आहे.

याबाबत अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार होवू नये, यासाठी लॉकडाऊनसारखे कटू निर्णय सरकारला घ्यावे लागले आहेत. यामुळे कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू झाले आहेत. काही ठिकाणी तर उपासमारीची वेळ कामगारावर आली आहे. यामुळे मानवतेच्या दृष्टीने देशातील व राज्यातील सर्वच क्षेत्रातील आस्थापनांना व मालक वर्गास कोणत्याही कामगारास कामावरून काढू नये किंवा पगार थांबवू नये, अशा सक्त सुचना करण्यात आल्या आहेत. परंतु, राज्य सरकारचाच उपक्रम असणार्‍या एसटी महामंडळाने कोरोना संकटाचे कारण पूढे करून 2019 च्या कालखंडात भरती झालेले व आज अखेरचे कर्मचारी व प्रशिक्षणात असणारे जवळ जवळ 10,000 कर्मचार्‍यांची ‘सेवा स्थगित’ या गोंडस नावाखाली खंडीत केल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

कर्मचार्‍यांचे जीवनमान उद्ध्वस्त करणारा हा निर्णय राज्य शासनाने तातडीने हास्तक्षेप करून रद्द करावा आणि कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा. अन्यथा, जनतेच्या संयमाचा बांध फूटेल. कर्मचार्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व अखील महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ या अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!