अमेरिकेत कोरोनाने 24 तासात 1500 लोकांचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आतापर्यंत 91 हजार मृत्यू तर वैज्ञानिकांच्या मते जुलैपर्यंत दोन लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 19 : अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून 24 तासात 1500 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत अमेरिकेत कोरानामुळे 91 हजार लोकांच्या मृत्यूची नोंद झालीय. तब्बल 15 लाखाहून अधिक कोरानाबाधित अमेरिकेत आहेत. दरम्यान वैज्ञानिकांच्या मते जुलैपर्यंत अमेरिकेत दोन लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तविण्यात आलीय.

एकीकडे अमेरिकेत कोरानामुळे मृतांचा आकडा वाढतोय तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लॉकडाऊन शिथील करण्याचा विचार करतायेत. यामुळे चोहोबाजूंनी ट्रम्प यांच्यावर टीका होतेय. दरम्यान एका पत्रकार परिषदेत अमेरिकेत वाढणाऱ्या कोरोना केसेस संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं आम्ही जास्तीत जास्त टेस्ट करतो आहोत. त्यामुळे कोरोना केसेस वाढत आहेत. जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करणारा अमेरिका जगातील पहिला देश आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत एक कोटीही अधिक जणांच्या कोरोना टेस्ट झालेल्या आहेत. या प्रकारामध्ये भारताचा नंबर सातवा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!