कोरोना वाढतोय; फलटण तालुक्याची नेमकी परिस्थिती काय ?; पहा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ एप्रिल २०२३ । फलटण । गेल्या काही दिवसापासून देशामध्ये व राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढायला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. यामध्ये आताच्या घडीला नक्की फलटण तालुक्याची परिस्थिती नेमकी काय आहे ? फलटण तालुक्यात सध्या कोरोनाचे किती रुग्ण आहेत ? किती रुग्ण सध्या गृह विलीगीकरणामध्ये आहेत ? हॉस्पिटलमध्ये किती रुग्ण उपचार घेत आहेत ? याचा आज दैनिक स्थैर्य आढावा घेत आहे फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडून….

सध्या संपूर्ण देशासह राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता सरकारने पुन्हा नूतन निमयावली जाहीर केलेली आहे. त्यामध्ये आता फलटण तालुक्यात पूर्वीप्रमाणे कोरोनाची चाचणी सुरु करीत आहोत. कोरोना व इन्फ्लुएंझाची लक्षणे हि एकसारखीच असल्याने अश्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या सल्यानुसारच पुढील उपचार घेणे गरजेचे आहे. आता आगामी काही दिवसामध्ये तालुक्यातील सर्व आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच आता कोरोना चाचणीचे प्रमाण सुद्धा वाढवण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये पूर्वीप्रमाणेच कोरोनाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.

आता येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी जरा जास्त प्रमाणामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची जी त्रिसूत्री आहे ती पुन्हा पाळणे गरजेचे आहे. म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी बाहेत पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्यानंतर वारंवार हात धुणे गरजेचे आहे. त्यासोबतच जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे. आजारी असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी बाहेर न जाता घरामध्येच राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी केले आहे.

सध्या फलटण तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व सर्व खाजगी रुग्णालये येथे कोरोनावर उपचार सुरु आहेत. सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचे ३ ऍक्टिव्ह रुग्ण असून तीनही रुग्ण हे गृह विलीगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयामध्ये एकही रुग्ण कोरोनावर उपचार घेत नाही, असेही प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!