सातारा पोलीस दलात करोनाचा शिरकाव


स्थैर्य, सातारा, 02 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच आता साताऱ्यात नाकाबंदीवर कर्तृव्य बजावणाऱ्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील बाधित रुग्णाचा आकडा पाचशे पार झाला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 556 झाली असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे.  1 जून रोजी दिवसभरात जिल्ह्यात 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  यामध्ये सातारा पोलीस दलात फौजदारपदी कार्यरत असलेल्या अधिकार्‍यालाही कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिकाऱ्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील हे पहिले पोलीस अधिकारी आहेत ज्यांना लागण झाली आहे. सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ येथील नाकाबंदीवर तपासणी दरम्यान त्यांना लागण झाली असल्याची माहिती समोर आली.

कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!