स्थैर्य, दि.१७: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 51 लाख पार झाला आहे. आतापर्यंत 51 लाख 18 हजार 605 लोक संक्रमित झाले आहेत. मागील 24 तासांत विक्रमी 97 हजार 856 नवीन रुग्ण आढळले. याआधी 11 सप्टेंबर रोजी 97 हजार 856 रुग्ण सापडले होते.
दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देशात आतापर्यंत 382 रुग्णांचा बळी गेला. यामध्ये 27 ते 85 वयोगटातील डॉक्टरांचा समावेश आहे. आयएमएने केंद्रांने केंद्र सरकारच्या त्या विधिनावर नाराजी व्यक्त केली, ज्यात सरकारने संसदेत म्हटले की, कोरोनामुळे जीव गमवणाऱ्या किंवा या विषाणूची लागण झालेल्या डॉक्टरांचा आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांचा डेटा नाही. दरम्यान सरकारने या कोरोना योद्धांना शहीदाचा दर्जा द्यावा असे आयएमएने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
जगात कोरोनाची 3 कोटींहून अधिक प्रकरणे
जगभरातील कोरोना संक्रमितांचा आकडा 3 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 3 कोटी 33 हजार 674 प्रकरणे समोर आली होती. दरम्यान बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आता 2 कोटी 17 लाख पेक्षा जास्त झाली आहे. तर कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 9 लाख 44 हजार पेक्षा जास्त झाली आहे.