म्हसवड शहरात कोरोनाचा विस्फोट, दोन दिवसांत सापडले नवीन ३२ कोरोना रुग्ण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड दि. ८ : म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका, आरोग्य, महसुल व पोलीस यंत्रणेकडुन निकराचे प्रयत्न सुरु आहेत, याचाच एक भाग म्हणुन शहरात विविध ९ ठिकाणी कोरोनाची रँपीड टेस्ट केली जात असुन गत दोन दिवसांपासुन शहरात रँपीड टेस्ट सुरु असुन आजवर शहरातील २०० लोकांची रँपीड टेस्ट घेण्यात आली असुन त्यापैकी ३२ जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आला आहे त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता ३०० घरात पोहचली आहे.

म्हसवड शहरात कोरोनाने अक्षरशा थैमान घातले असल्याने शहरात कोरोनाची प्रचंड  दहशत निर्माण केली असल्याने शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असुन शहरातील कंटेटमेंन्ट झोनमधील सर्व बाधितांच्या संपर्कातील नागरीकांच्या कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी शहरात जंबो रँपीड टेस्ट सुरु केल्या असुन शहरातील विविध ९ ठिकाणी नागरीकांच्या अशा प्रकारच्या टेस्ट करण्याची सोय प्रशासनाने केली आहे मात्र गत दोन दिवसांपासुन शहरात सुरु असलेल्या या जंबो रँपीड टेस्ट ला म्हसवडकरांचा प्रतिसाद अत्यल्प मिळत असल्याचे दिसुन येत आहे. गत दोन दिवसांपासुन शहरात सुरु असलेल्या या रँपीड टेस्ट साठी पुढे येवुन आपली कोरोना तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात असले तरी नागरिक अशा प्रकारच्या तपासणीला समोर येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे असुन दोन दिवसांत अवघ्या दोनशे लोकांनी आपली कोरोना टेस्ट केली असुन त्यापैकी ३२ जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आला आहे. 

दरम्यान दि. ८ रोजी रँपीड टेस्ट च्या आलेल्या अहवालानुसार गुरव गल्ली येथील ४, मेनरोड येथील ४, नरसिंह पार येथील ७, व अन्य ठिकाणच्या ४ जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आला आहे. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची आजअखेर संख्या ही २७९ एवढी झाली आहे.

नागरीकांनी आपली रँपीड टेस्ट करावी –

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात सुरु असलेल्या रँपीड कोरोना टेस्ट साठी नागरीकांनी पुढे यावे आपल्याला जर काही त्रास होत असेल तर तो लवकर समजेल व त्यावर उपचार करता येतील त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता त्वरीत आपली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागा कडुन करण्यात आले आहे.

एकाचा उपचारा दरम्यान मृत्यु –

म्हसवड शहरातील एका खाजगी कोव्हीड रुग्णालयात उपचार घेणार्या कोरोना रुग्णाचा दुर्देवी अंत झाला असुन मृत हा माण तालुक्यातील शिंदी – भांडवली गावचा असल्याची माहिती समोर आली आहे.

म्हसवड येथे सुरु असलेल्या रँपीड कोरोना टेस्ट चे बोलके छायाचित्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!