स्थैर्य, म्हसवड दि. २७ : म्हसवड शहरात कोरोनाने अक्षरशा कहर केला असुन रोज वाढणार्या आकड्यांमुळे म्हसवडकर जनतेला आकडी भरली आहे, एकाच दिवशी शहरातील २० जणांना बाधा झाल्याचा कोरोना अहवाल असल्याने शहरातील जनता कर्फ्यु वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
म्हसवड शहरातील कोरोनाची रुग्ण संख्या ही शंभरी पार गेल्याने म्हसवडकर नागरीक व प्रशासनाने एकत्र येत शहरात दि. २३ ते २८ पर्यंत पर्यंत ५ दिवस जनता कर्फ्यु सुरु केला आहे, या जनता कर्फ्यु तुन फक्त अत्यावश्यक सेवा म्हणुन दवाखाने व मेडीक्लस् आदींना सवलत देण्यात आली असुन इतर सर्व दुकाने कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी शहरात नवीन रुग्ण वाढतच असुन जनता कर्फ्यु च्या ४ थ्या दिवशी शहरात नवीन २० रुग्णांची भर पडली आहे, शहरात जनता कर्फ्यु सुरु असतानाही दररोज रुग्ण सापडत असल्याने शहरात सुरु असलेला जनता कर्फ्यु यापुढे आणखी वाढण्याची चर्चा म्हसवडकर जनतेत सुरु आहे.
दरम्यान दि. २६ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार ६५ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, २१ वर्षीय पुरुष, १३ वर्षीय मुलगा, ५६ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय युवक, ८१ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, २८ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगा, ३१. वर्षीय पुरुष, २१ वर्षीय युवक, ७४ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय युवक, २० वर्षीय युवक आदी २० जणांना कोरोनाची बाधा झाली असुन यामध्ये भगवान गल्ली येथील १ जण, माळी गल्ली येथील २ जण, कोष्टी गल्ली ३ जण, सुतार गल्ली २ जण , मल्हारनगर येथील ५ जणांचा समावेश आहे तर उर्वरीत हे म्हसवड शहरातील इतर ठिकाणचे रहिवाशी आहेत.
दि. २७ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार शहरात नवीन २० रुग्ण हे बाधित झाले असुन यामुळे शहरतील आजवरची कोरोना रुग्ण संख्या ही १३५ वर पोहचली आहे.