पसरणी गावावर कोरोनाचे संकट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पांचगणी, दि. 9 : वाई तालुक्यातील पश्‍चिम भागात कोरोनाचे थैमान उठले आहे. भागातील अनेक गावांमध्ये कोरोना रोगाचा फैलाव गतिमान झाल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. अशा परिस्थितीत पसरणीमध्ये मात्र प्रशासकीय यंत्रणा असंवेदनशील असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या चुकीच्या धोरणांमुळे आज पसरणीत कम्युनिटी स्प्रेड झाल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.

पसरणीत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा न्याय राबविल्याने तर ग्रामसेवकाने चामडी बचावचे धोरणअवलंबल्याने कोरोनाची लिंक मात्र तुटण्याचे नाव घेत नाही. ग्रामदक्षता समितीने आजमितीला कडक धोरण अवलंबले असले तरीही प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पसरणी गाव डेंजर झोनमध्ये आले आहे. याउलट गरीब ग्रामस्थांची कुटुंबे क्वारंन्टाईन करण्यात येत होती. मुजोर व पैसेवाल्यांना मात्र पायघड्या अंथरण्याचे काम प्रशासकीय अधिकार्‍यांनी केल्याचे परिणाम पसरणी आज  भोगत आहे. आजपर्यंत पसरणीत 6 कोरोना पेशंट सापडले आहेत. एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

पसरणीमध्ये मागील 4 महिन्यात शेकडो ग्रामस्थ पुणे व मुंबईमधून आले आहेत व अजूनही येणार्‍यांची संख्या वाढतच आहे. मुंबईहून आलेल्या लोकांवर कारवाई होईल व त्यांना संस्था विलगीकरण करण्यात येईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, असे काहीच झाले नसल्याने नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. बँकेचा पसरणी गावात राहणारा कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याने गावात रांग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाची लागलेली साखळी तोडण्यासाठी गाव चारही बाजूने बंद करण्यात आले आहे. एकाच दिवशी तीन रुग्ण सापडल्याने पसरणीकरांची झोपच उडाली आहे. बँक कर्मचार्‍यांमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पुन्हा एकदा वाई तालुक्यातील असले कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!