आमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं कोरोना सेंटर


 

स्थैर्य, दहिवडी, दि.१४: सातारा जिल्ह्यातील खटाव कोरेगाव विधानसभेचेविद्यमान आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने कोरेगाव येथिल जितराज मंगल कार्यालयात कोरोना बधितांसाठी 300 बेडचं अद्यावत व ऑक्सिजन सुविधा युक्त कोरोना सेंटर सुरू केले असून मतदार संघातील एकही कोरोना बाधित व्यक्ती उपचारापासून वंचित ठेवणार नाही असंही शिंदे यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी ९ वाजता आ.महेश शिंदे यांनी येथील जितराज मंगल कार्यालय येते कोरोना सेंटरची पाहणी केली,तसेच या सेंटर मद्ये कोरेगाव मतदार संघातील ज्या व्यक्तीना कोरोना झाल्यास त्वरीत उपचार मिळणार आहे.शिंदे यांनी “आपल्या मतदार संघातील एक ही कोरोना पेशंट उपचारापासून वंचित राहणार नसल्याचे या वेळी सांगितले. या कोविड सेंटर मध्ये कोरोना पेशंटला ऑक्सिजनची अद्यावत सुविधा असेल.खऱ्या अर्थाने या मतदार संघातील लोकांसाठी केलेलं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!