स्थैर्य, फलटण, दि.३०: फलटण तालुक्यात वाढत चाललेली कोरोना रुग्नांची संख्या पहाता रुग्नांना अरोग्य सुविधा उपलब्ध होणे जिकरीचे होऊ लागले आहे वेळेवर आॅक्शिजन मशिन उपलब्ध असलेले बेड उपलब्द होऊ न शकल्याने मृत्यूचे प्रमाण वाढु लागले आहे याच असुविधेचा त्रास सस्तेवाडीकरांसाठी होऊ नये आॅक्शिजन अभावी कोणत्याही नागरिकाला प्राण गमवावा लागू नये म्हणुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जान्हवी सामाजिक संस्थेच्या सहकार्याने सस्तेवाडी गावात १० बेडचे कोरोना केअर सेंटर बसस्थानकाजवळ अशोकशेट सस्ते यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये स्थापन करण्यात आले असुन यामध्ये गरजुंसाठी मोफत पोर्टेबल आॅक्शिजन मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे अशी माहिती ग्रामपंचायत व जान्हवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या कडुन मिळाली आहे