आदर्श समाज निर्मितीसाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय असणे गरजेचे – अनुराधा आळतेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
आदर्श समाज निर्मितीसाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे समन्वय असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्रीमती अनुराधा आळतेकर यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभात केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटण यांचेमार्फत नवलबाई कार्यालय, फलटण येथे विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती समारंभ पार पडला. यावेळी श्रीमती आळतेकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद विभुते व संस्थेचे अध्यक्ष विजय ताथवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी श्रीपाद विभुते यांनी सर्व ब्राह्मण कुटुंबांनी समाजात एकी दाखवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी वैशाली विठ्ठल देशपांडे, ऋचा केदार गरवारे, क्षीति अजय देवळे, रुपेश विजय देवरे, अक्षदा हेमंत कुलकर्णी, अमृता अमोल कुलकर्णी यांना विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच इयत्ता दहावी संस्कृत काळे, श्रेया उपेंद्र, कुलकर्णी अमृता जयंत, पटवर्धन समृद्धी महेश, गोसावी स्वधा संजीवन तसेच इयत्ता बारावी देवरे रुपेश विजय, कुलकर्णी अमृता जयंत, कुलकर्णी वेदांती सचिन यांना उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक ठोंबरे सार्थक संदीप व विशेष शिष्यवृत्तीमध्ये इनामदार सिद्धी संतोष, कुलकर्णी श्रुती अमोल, प्रभुणे ईशान योगेश, देशपांडे श्रद्धा रवींद्र, नांदे अथर्व पुष्कर यांना सन्मानित करण्यात आले. वि. म. रानडे यांच्याकडून तीन विद्यार्थ्यांना भरघोस रोख रक्कम देण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांची ओळख अ‍ॅड. विजयराव कुलकर्णी व अनिरुद्ध रानडे यांनी करून दिली. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन स्वानंद जोशी यांनी केले तर आभार नितीन लाटकर यांनी मांडले.

या कार्यक्रमास पालक सभासद, विद्यार्थी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!