
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सज्जनगडावरील विकासकामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत परळीचे नेहमीच सहकार्य असते. स्थानिक प्रशासन म्हणून ग्रामपंचायत परळीने आम्हाला सहकार्य केले आहे. येथील बांधकामे तसेच इतर विकासकामांसाठी स्थानिक प्रशासन म्हणून आम्ही त्यांना विचारात घेवून विकासकामे मार्गी लावू असे प्रतिपादन रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्थ सु. ग. स्वामी उर्फ बाळासाहेब स्वामी यांनी परळी येथे ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत केले. यावेळी परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच नंदकुमार धोत्रे, ग्रामसेवक पृथ्वीराज अहिरेकर, संस्थान चें विश्वस्त दीपक पाटील, सुनील खामकर, गजानन बोबडे, यशवंत गंगावणे, नंदकिशोर पानसरे गजानन दळवी राजेंद्र परळे राजेंद्र ऐकबोटे ,आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच बाळासाहेब जाधव म्हणाले, सज्जनगडाच्या विकासासाठी ग्रामपंचायत परळी नेहमीच तत्पर असते. सज्जनगडचा नावलौकिक भारतभर झाला पाहिजे. गडावरील कोणत्याही वास्तूंचे नुतनीकरण असो नवीन बांधकामे असोत किंवा रस्ते, क्रेन बसवणे असा सर्व बाबींसाठी स्थानिक प्रशासनाची परवाणगी सुचना घेण्यात याव्यात. ग्रामपंचायत परळीच्या अधिपत्त्याखाली सज्जनगड येत असल्याने प्रत्येक कागदपत्रावर सज्जनगड परळी असा उल्लेख असने गरजेचे आहे. यावेळी पायरी मार्ग दुरुस्ती, यावर चर्चा करण्यात आली.
सज्जनगडवरील व्यावसायींकांची थकबाकी
सज्जनगडवरील व्यावसायीकांनी अनेक वर्षांपासून दुकानाचे गाळे भाडे न भरल्याने परळी ग्रामपंचायतीचा लाखों रुपयांचा महसूल थकबाकीत आहे. हा महसूल गोळा झाल्यास विकासकामे मार्गी लागतील.
– नंदकुमार धोत्रे, उपसरपंच