… आणि कुलीच्या ठोश्याची आठवण झाली !!
स्थैर्य, लोणंद, दि. १२ : महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पाँझिटीव्ह ही बातमी समजताच माझ्या प्रमाणे देशातील तमाम चाहत्यावर्गामध्ये एकच खळबळ उडाली असणार यात शंका नाही.
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली हे त्यांनी स्वत च ट्विटर वरुन शनिवारी रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी ट्विट करुन माहिती देताच हा संदेश जगभरातील आणि देशातील चाहत्यासाठी धक्कादायकच होता या घटनेमुळे सगळ्यांनाच १९८२ सालातील कुली चित्रपट चित्रीकरणावेळी झालेल्या दुखापतीची आठवण झाली असणार.
कारण सध्या अमिताभ यांची तरुणांना लाजवेल अशीच काम करण्याची स्टाईल आहे. ७५% टक्के लिव्हर खराब झालेला हा महानायक अनेक व्याधीशी झूंज देतोय आणि प्रत्येक जाहिरातीमध्ये स्वतःच्या च प्रतिमेचा चलनी नाण्यासारखा वापर करतोय. ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण आजही बच्चन यांना पर्याय नाही हेच खरे !
नुकतेच कोरोना संसर्ग झाल्याची माहिती देऊन कुलीच्या अपघाताची आठवण ताजी झाली यामध्ये झालेल्या दुखापतीतून त्यांना जीवदान मिळाले होते .त्यामुळे अमिताभ बच्चन रुग्णालयात ही बातमीच सध्याच्या काळातही काळजाचा ठोका वाढविणारी आहे.
जगातच हा रोग धुमाकूळ घालत आहे मात्र अशा सेलिब्रिटी आणि महानायक असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनाही कोरोना लागण होते हिच बाब सगळ्यांच्या काळजाचा ठोका चूकविणारी आहे. कारण आपल्या तब्येतीची अंखडपणे काळजी घेणारे आणि एका हाकेला सगळी नामवंत डाँक्टर मंडळीची फौज उभी करणारा ही या कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो हे सत्य समोर आले आहे. मग सर्व सामान्य मंडळीचे काय होत असेल याचीही चिंता सगळ्यांना सतावत आहे.
अमिताभ आपल्या अभिनयाच्या ताकदीवर गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या हदयसिंहासनावर विराजमान आहे. उत्तम अभिनय, कामात झोकून द्यायची सवय आणि वक्तशीरपणा ह्या गुणामुळेच नावलौकिक टिकून आहे.
अमिताभ यांनी वारंवार आपल्या आजारावर याशस्वी मात केली आहे आणि करीत सुध्दा आहेत. हे समिकरणच निर्माण होत आहे. कारण कुलीच्या १९८२ मधील चित्रीकरणादरम्यान एका सीनमध्ये पूनीत इस्सार हा अमिताभ यांना मारहाणीचा प्रसंग चित्रीत करायचा होता मात्र यावेवी डमी वापरा असे इतरांचे म्हणणे होते मात्र हा सीन मीच करणार असे अमिताभ यांनी सांगितले आणि तो सीन डमी न वापरता केला.दरम्यान यावेळी अमिताभ यांच्या पोटाला तेथील टेबलाचा कोपरा घुसला.मात्र वरवर जखम दिसत नव्हती, चार पाच दिवसांनी मग त्रास वाढला त्यात त्यांना उलट्या आणि हदयाचे ठोके ही वाढले.दरम्यान त्याचवेळी बेंगलोर येथे आँपरेशन करावे लागले. यावेळी जणु भारतच शांत झाला असे चित्र निर्माण झाले होते.
प्रत्येक मंदिर, चर्च, गुरुद्रारे , मशिद यामध्ये अमिताभ बरा व्हावा म्हणून देशभर प्रार्थना , उपवास, आरती सुरु होते. याच काळात सुमारे २०० हून अधिक लोकांनी दवाखान्यात रक्तदान केले होते. त्याचाही उपयोग झाला होता. मात्र या रक्तदात्यामध्ये चूकून तेथे रक्त देताना हेपेटायटिस बी चा संसर्ग झाला होता त्यामुळे लिव्हर खराब झाले होते. तेथील नावाजलेले सर्जन डाँ.एच.एस.भट्ट यांनी तपासणी केली मात्र इन्फेक्शन असल्याचे सांगितलं गेले. पोटातील महत्त्वाच्या आतड्यांना दुखापत झाली होती. त्यात निमोनिया ही झाला होता. अशा काळात तब्येतीत फरक न पडल्याने विमानाने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान याचवेळी पुन्हा एक आँपरेशन करावे लागले ते सुमारे आठ तास चालले होते त्यानंतर महिना भराने घरी सोडण्यात आले त्यावेळी तारीख होती २ आँगस्ट ! मृत्युशी संघर्ष केला म्हणून दुसरा जन्म दिवस म्हणून साजरा ही केला जातो.
याच काळात मुंबईत विमान तळावरुन अमिताभ यांना आणण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची रुग्णवाहिका पाठवून दिली होती . त्यामुळेच आपले प्राण वाचले आणि बाळासाहेब यांनी मदत केली नसती तर आज कदाचित मी जिवंत नसतो असेही अमिताभ यांनी ठाकरे चित्रपट प्रदर्शन कार्यक्रमात आठवण सांगितली होती.
दरम्यान अमिताभ बच्चन यांनी वारंवार आपल्या तब्येतीची माहिती चाहत्यांना देतच होते आणि त्यातून ते बरेही होत होते. विविध वाहिन्यावरील आजारासंबधीच्या कितीतरी प्रबोधनात्मक जाहिराती त्यांनी केल्या होत्या. कौन बनेगा करोडपती ? या ११ व्या पर्वात एका स्पर्धेकाशी बोलताना अनेक व्याधी विषयी माहिती सांगितली , मेमरी लाँस होणे तसेच हात थरथारणे सही सुध्दा नीट करता येत नव्हती.हाताच्या मांसपेशीतुटल्याने एक हात व्यवस्थित काम करीत नाही. मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजाराचाही सामना करावा लागत आहे. त्यातच हँपेटायटिस आणि टीबी (२०००) सारखे आजारही झाले असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेली अनेक वर्षे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
वयाच्या ७७ व्या वर्षीही ७५% लिव्हर काम करीत नाही. तर २००५ मध्ये पोटात प्रचंड दुखत होते.गँस्टो सारखे वाटत होते मात्र आतडीच कमकुवत झाली होती.त्यावर वारंवार सुज येत असे.
अस्थामाचाही आजार बळावला होता मात्र नियमित उपचार आणि पथ्ये असल्याने त्यावरही मात करीत आहेत. त्यांच्या फुस्फुसाला आँक्सिजन पुरवाठा कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे दम लागणे हाही प्रकार दिसुन आला आहे. त्यातच खुप जूना असणारा मायस्थेनिया ग्रेव्हिस हा ही आजार त्यांना सतावत आहे.
अशा अनेक व्यांधीशी झुंज देणारा महानायक कोरोनालाही झुंज देऊन पून्हा आपल्या समोर हात उंचावून प्रतिक्षा , किंवा जलसा, अथवा जनक बंगल्यासमोर उभा राहिल यात शंका नाही.आनेक व्याधीची प्रबोधनात्मक जाहिरात करुन रुग्णांना दिलासा देणारे, त्यांच्यात जगण्याची नवी उमेद देणारे कलावंत म्हणून पुन्हा समोर येतील आपण सारे त्यांना आणि देशभरातील तमाम कोरोनाग्रस्तांसाठी प्रार्थना करुया !!
अमिताभ बच्चन यांचा संदेश ****
सगळ्या रुग्णालयामध्ये जितके डाँक्टर आणि नर्स काम करीत आहेत ते सर्व ईश्वराचे रुप आहेत.तुम्ही मानवतेसारखे काम करत आहात.जीवदानाच काम करीत आहात मी तुम्हा सगळ्यासमोर नतमस्तक आहे .
संतोष ह.राऊत, लोणंद (जोतिबानगर), ता.खंडाळा जि.सातारा, 9960104345