दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक / शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सुविधा 15 फेब्रुवारी पासून सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत सुरू राहील.

हेल्पलाईन क्रमांक 022-27893756 आणि 022-27881075 हे आहेत. कार्यालयातील हेल्पलाईनसाठी डॉ.ज्योती परिहार, सहसचिव (7757089087), श्रीमती गीता तोरस्कर, वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.) (7021325879), श्रीमती सुप्रिया मोरे, वरिष्ठ अधीक्षक (9819136199) आणि श्रीमती सुवर्णा तारी, वरिष्ठ अधीक्षक (9987174227) या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर, समुपदेशक म्हणून श्रीकांत शिनगारे – 9869634765, मुरलीधर मोरे- 7977919850 / 9322105618, 022-27893756/ 022-27881075. हयाळीज बी.के.- 9423947266, अनिलकुमार गाढे – 9969038020, जाधव विकास नारायण – 9867874623, विनोद पन्हाळकर – 9527587789, संजय जाधव – 9422594844, चंद्रकांत ज.मुंढे – 8169699204, अशोक देवराम सरोदे – 9322527076/ 8888830139, श्रीमती शैलजा मुळ्ये – 9820646115, शेख अखलाक अहमद अ.रज्जाक – 9967329370, श्रीमती स्नेहा अजित चव्हाण – 8369015013 आणि श्रीमती उज्ज्वला क.झरे – 9920125827 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!