
स्थैर्य, फलटण, दि.१०: राज्यभरातील हजारो शासकीय बांधकाम कंत्राटदारांची बिले थकीत असल्फयाने त्यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ लागली आहे मागील वर्षापासून जवळपास सहा हजार कोटी रुपयेहुन अधिक शासनाकडे थकीत असल्याने बिले न मिळाल्यास राज्यातील कंत्राटदार काळी दिवाळी साजरी करण्याबरोबरच दिनांक 25 पासून आंदोलन करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सिकंदर डांगे यांनी दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री यांना कंत्राटदार संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षापासून राज्यातील छोट्या-मोठ्या कंत्राटदारांची सहा हजार कोटींहून अधिक बिले शासनाकडे थकीत आहेत राज्यातील मोठ्या कंपनीच्या कामांना द्यायला शासनाकडे पैसा आहे मात्र लहान-मोठ्या कंत्राटदारांचे थकीत बिले द्यायला शासन टाळाटाळ करीत आहे राज्यातील छोटा-मोठा कंत्राटदार बँकेची कर्ज काढून कामे करीत असतो मात्र वेळच्यावेळी शासनाकडून पैसे न मिळाल्याने बँकांचे व्याज वाढत चालले असून इतर आर्थिक देणी देणे ही कंत्राटदारांना अवघड झाले आहे छोट्या कंत्राटदारांना बेरोजगार करण्याचा व त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार शासनाकडून सुरू आहे आर्थिक गर्तेत सापडलेल्या कंत्राटदारांची थकित बिले न मिळाल्याने उपासमार होऊ लागली आहे.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे 3500 कोटी ग्रामविकास विभागाचे साडेसातशे कोटी नगर विकास विभागाचे दोन हजार 700 कोटी जलसंपदा विभागाचे 671 कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकीत असून ही बिले दिवाळीपूर्वी न मिळाल्यास कंत्राटदार कुटुंबासोबत काळी दिवाळी साजरी करतील तसेच दिनांक 25 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन तसेच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हि आंदोलन करनार असल्याचा इशारा कंत्राटदार संघटनेतर्फे सिकंदर डांगे यांनी दिला आहे.