उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टर राम निंबाळकर यांचा गौरव


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
सय्यद पिंप्री (नाशिक) येथे राज इन्फ्रास्ट्रक्चरच्या नाशिकमधील दुसर्‍या साईटचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी नाशिक येथील हायवेचे काम घेतलेल्या फलटण येथील कॉन्ट्रॅक्टर राम निंबाळकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

अजितदादा म्हणाले की, राम निंबाळकर हे आमच्या फलटणचे असून त्यांचे काम अतिशय दर्जेदार आहे. त्यांच्या नावातच ‘राम’ आहे व त्या नावाला शोभूनच हायवेचे काम होईल.

या कार्यक्रमास मान्यवरांसह नाशिककरांची बहुसंख्येने उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!