सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची संततधार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा जिल्ह्याच्या पूर्व पेक्षा पश्चिम भागात सुमारे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर जोरदार संततधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी रात्रीपासून हा पाऊस एकसारखा पडत असून त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे .त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या कोयना धरणात गेल्या 24 तासात सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

दरम्यान मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला 175 मिलिमीटर ,महाबळेश्वर येथे 181 मिलिमीटर तर नवजा येथे 191 मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात महाबळेश्वर जावली, बामणोली ,तापोळा या परिसरात पावसाचा जोर अधिक वाढला आहे. सुमारे एक महिना तुरळक पावसामुळे शेतकरी चिंतित होते. मात्र हा पाऊस पेरणी केलेल्या पिकांसाठी तसेच भातशेतीसाठी मोठा वरदान ठरणार आहे.

कोयना धरणाचा पाणीसाठा 54 .20टीएमसी इतका झाला आहे तर हा पाणी साठा कालपर्यंत 52 . 51  होता म्हणजे 24 तासात कोयनेतील पाणीसाठा तब्बल 1. 69 टीएमसीने वाढला असून धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!